एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग तर्फे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा १६२ वा वर्धापन दिन सोहळा साजरा

             महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. दि. १६, १७ व १८ नोव्हेंबर २०२२ रोजी निरनिराळया आंतर महाविद्यालयीन खेळाच्या स्पर्धाचे आयोजन केले गेले महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
           दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी वर्धापन दिनाच्या मुख्य सोहळयाचे आयोजन एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये केले गेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रा. मिलिंद काळे यानी भूषविले तर प्रमुख पाहूणे  म्हणून डॉ. विकास कस्तुरे, विभाग प्रमुख रसशास्त्र विभाग एम इ आयुर्वेद महाविद्यालया यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन, संस्थापक कै. वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापुरकर यांच्या प्रतिमांचे पुजन व सरस्वती वन्दनेने झाली. म ए सो चे गीत सर्वाना ऐकवण्यात आले. मान्यवरांचे स्वागत झाल्यावर महाविद्यालायातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यानी संस्थेबद्द्ल माहिती देत आपल्या या संस्थेतील अनुभवांचे कथन केले. प्राध्यापक मिलिंद काळे यानी आपल्या अनुभवांचे कथन करताना संस्थेची ध्येये व उद्दिष्टे विद्यार्थ्याना सांगितली व त्या दृष्टीने प्रयत्न करा असे आवाहन केले. डॉ. विकास कस्तुरे यांनी आपल्या अनुभवांची शिदोरी उलगडून दाखवताना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मधील कामाचा अनुभव काम करत असताना मिळणारे व्यक्ती स्वातंत्र्य व मिळणारा आदर विशद केला यानंतर खेळाच्या  स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
            कार्यक्रमात यानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ध्वनी चित्रफीत दाखवण्यात आली.
            आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *