एम. इ. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जयंती साजरी

            भारतीय स्वातंत्रत्र्याच्या इतिहासात सशस्त्र क्रांतीचा लढा देणाऱ्या अनेक स्वातंत्र्यवीरांमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अशा या थोर देशभक्ताचे स्मरण व्हावे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाची माहिती मिळावी व त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याला मानवंदना या उद्देशाने त्यांचा जन्म दिवस एम. इ. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कॉलेजच्या सभागृहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सुरवातीला आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. शिवप्रसाद हळेमनी उपप्राचार्य एम. इ. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आद्यक्रांतीकारकांच्या कार्याची माहिती दिली उपप्राचार्य शिवप्रसाद हळेमनी यांनी आद्यक्रांतिकारकांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीतील योगदानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
            या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. विद्या भालेकर या विद्यार्थिनीने केले.
Scroll to Top
Skip to content