महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ नर्सिंग व परशुराम रुग्णालय या दोन शाखा गेली पंधरा वर्षे लोटे या परिसरात कार्यरत आहेत. संस्थेच्या 164 व्या वर्धापन दिनानिमित्त एका महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.दिनांक १८/११/२०२३ रोजी ग्रामपंचायत शेल्डी येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या दरम्यान हे शिबिर पार पडले.या शिबिरात एकूण ८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या रक्त व लघवीच्या तपासण्या करण्यात आल्या.तसेच मोफत औषधेही देण्यात आली.परशुराम रुग्णालयाच्या डॉ.प्रसाद गोखले, डॉ.प्रदीप वासंबेकर,डॉ.निकिता जाधव यांनी रुग्ण तपासणी केली. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी देखील आपले योगदान दिले.त्यामुळे या शिबिराला जास्तीत जास्त ग्रामस्थ उपस्थित राहू शकले व शिबिराचा लाभ घेऊ शकले.नर्सिंग कॉलेज तर्फे असि.प्रोफे.सृष्टी बंडबे, ऐशले फर्नांडिस यांनी या शिबिराचे नियोजन केले. या शिबिराला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस डायरेक्टर डॉ. श्याम भाकरे तसेच कॉलेज ऑफ नर्सिंग चे प्राचार्य मिलिंद काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.