महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ , नाशिक आयोजित स्पंदन मधील एम इ एस नर्सिंग कॉलेजचे यश.

 

                    विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा तसेच अभ्यासाबरोबर त्यांच्यातील कलांचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक दरवर्षी स्पंदन या कार्यक्रमाचे आयोजन करते व त्यांच्याशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना यात भाग घेण्यासाठी प्रेरित करते. चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच २०२२ -२३ या वर्षातील स्पंदनचे नुकतेच आयोजन केले गेले. यात ललित कला या विभागात एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग च्या एकूण तीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात साक्षी जाधव या विद्यार्थिनीला ऑन दी स्पॉट पेंटिंग मध्ये दुसरे पारितोषिक मिळाले. पक्षी आणि पर्यावरण या विषयावर तिने पेंटिंग केले होते. त्याचप्रमाणे सुजल जोशी या विद्यार्थ्याला स्पॉट पोस्टर मेकिंग मध्ये तृतीय पारितोषिक मिळाले. मानव आणि पर्यावरण या विषयावर त्याने पोस्टर बनविले होते. विद्यापीठाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात दोघांचा सत्कार करण्यात आला. एम इ एस आय एच एस चे डायरेक्टर डॉ.श्याम भाकरे,प्राचार्य मिलिंद काळे व सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.
Scroll to Top
Skip to content