महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ, नाशिक – राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पंदन २०२४ स्पर्धेत  एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंगचे  यश

                             विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा तसेच अभ्यासाबरोबर त्यांच्यातील कलांचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक दरवर्षी स्पंदन या कार्यक्रमाचे आयोजन करते. यातील एक स्पर्धा दि. 26 एप्रिल 2024 रोजी विश्वराज कॉलेज ऑफ नर्सिंग, लोणी, काळभोर, जिल्हा पुणे येथे घेण्यात आली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचा राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पंदन चाच तो एक भाग होता. एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंगने यशाची परंपरा कायम राखत यात यश मिळवले आहे. यात पाश्चिमात्य वाद्य संगीत स्पर्धेत कुमार प्रणव तुकाराम काताळे याला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. या स्पर्धेत प्रणवने क्लॅप बॉक्स या वाद्यावर एक धून वाजविली होती.
                            कोकणातील अतिदुर्गम डोंगराळ खेड तालुक्यातील आंबये  या गावचा तो सुपुत्र आहे. त्याला संगीत क्षेत्राची लहानपणापासून आवड आहे. संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याचा त्याचा मानस असतो.  विद्यापीठाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉ. देवेंद्र पाटील संचालक विद्यार्थी कल्याण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, श्री. प्रकाश पाटील समन्वयक स्पंदन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व प्रोफेसर शिवचरण सिंह गंधार प्राचार्य विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मान चिन्ह व पदक प्रदान करण्यात आले. एम इ एस आय एच एस डायरेक्टर डॉ.  श्याम भाकरे, प्राचार्य. मिलिंद काळे, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्‍त करून अभिनंदन केले आहे.

Scroll to Top
Skip to content