महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये युवा चेतना दिवस साजरा.

 

12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवा चेतना दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून एम.इ.एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, सेवा साधना प्रतिष्ठान व अमरजीत चव्हाण स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. स्वामी विवेकानंदांचे कार्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे तसेच त्यांनी स्वामीजींच्या चरित्राचा अभ्यास करावा व त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपले आयुष्य घडवावे हा या कार्यक्रमा मागचा विशेष उद्देश होता. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, स्वामी विवेकानंदांचे प्रतिमापूजन तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्य संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन व सरस्वती स्तवनाने झाली. कार्यक्रमात प्रथम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांविषयी आपले विचार मांडले व त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. यानंतर प्राचार्य मिलिंद काळे यांनी आपले विचार मांडताना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विवेकानंदांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावेत व त्यातूनच चांगले नागरिक घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर सेवा साधना प्रतिष्ठानचे सचिव विनीत वाघे यांनी स्वामीजींचा जीवनपट उलगडून दाखवत एकाग्रतेचे महत्त्व, संकटांशी सामना करा पळून जाऊ नका यासाठी स्वामीजींच्या जीवनातील घटनांचा अभ्यास करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमासाठी श्री. संदीप भाटिया, सचिव, सेवा साधना प्रतिष्ठान दादर, श्री. मानस घाडगे, सेवा साधना प्रतिष्ठान, श्रीमती स्मिता जा गोष्टी सामाजिक कार्यकर्त्या, प्राचार्य मिलिंद काळे, डॉ.अमित पाटील, विभाग प्रमुख स्वस्थवृत्त विभाग एम. इ.एस.आयुर्वेद महाविद्यालय,श्री. लिंगराजू ए आर विभाग प्रमुख कम्युनिटी हेल्थ डिपार्टमेंट यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामीजींचे विचार असणाऱ्या पोस्टर्सचे प्रदर्शन केले. या सर्व कार्यक्रमासाठी डॉ.श्याम भाकरे, डायरेक्टर एम. इ.एस.आय एच.एस. यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *